विद्यापीठ कर्मचारी संपावर: शास्त्रज्ञ अधिकार्‍यांकडे सोपवले गस्तीचे काम

By Admin | Updated: July 14, 2014 00:21 IST2014-07-14T00:21:31+5:302014-07-14T00:21:31+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर गेल्याने कृषी विद्यापीठ प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

University staff strike: Scientists handed over to the office | विद्यापीठ कर्मचारी संपावर: शास्त्रज्ञ अधिकार्‍यांकडे सोपवले गस्तीचे काम

विद्यापीठ कर्मचारी संपावर: शास्त्रज्ञ अधिकार्‍यांकडे सोपवले गस्तीचे काम

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर गेल्याने कृषी विद्यापीठ प्रशासनाची धावपळ सुरू आहे. एकही कर्मचारी कामावर येत नसल्यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने,शास्त्रज्ञ,अधिकार्‍यांना गस्तीच्या कामाला लावले आहे. रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २५ जूनपासून संपावर गेले आहेत. या कामबंद आंदोलनामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांंच्या वसतिगृहात घाण साचली आहे. पशू संवर्धन विभाग व प्रत्येक विभागातील गोठय़ात गुरांचे शेण साचले आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अकोला येथील मध्यवर्ती संशोधन विभाग व वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन क्षेत्रावरील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील मशागतीची कामे ठप्प पडली असून, पेरणी रखडली आहे. कर्मचारी कामावर परत येत नसल्यामुळे शास्त्रज्ञ, अधिकारी धास्तावले आहेत. या अधिकार्‍यांना दररोज रात्र व दिवसा कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर गस्त घालावी लागत आहे. त्यासाठी या शास्त्रज्ञ, अधिकार्‍यांच्या पाळ्य़ा ठरविण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न केल्यास या खरीप हंगामात कोणतीच कामे करणार नसल्याचा ठाम निर्धार या कर्मचार्‍यांनी केला आहे.

Web Title: University staff strike: Scientists handed over to the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.