सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाची एकजूट - संतोष हुशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 20:16 IST2022-10-16T20:15:52+5:302022-10-16T20:16:22+5:30
Unity of Mali community : सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील माळी समाजाच्या एकीची वज्रमुठ बांधली जात असल्याचे प्रतिपादन प्रा. संतोष हुशे यांनी येथे केले.

सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाची एकजूट - संतोष हुशे
अकोला : सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील माळी समाजाच्या एकीची वज्रमुठ बांधली जात असल्याचे प्रतिपादन प्रा. संतोष हुशे यांनी येथे केले. संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरु असलेल्या संपर्क अभियानाची अकोला येथे जिल्हा बैठकप्रसंगी तेर बोलत होते.
सावता परिषदेची अकोला जिल्ह्याची बैठक प्रा.संतोष हुशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी बोलताना हुशे म्हणाले की,सावता परिषद ही माळी समाजाचे सक्रीय संघटन असणारी राज्यव्यापी संघटना आहे.राज्यातील माळी समाजाचे दिशादर्शक संघटन आहे.या माध्यमातून समाजाचे ऐक्य निर्माण होत आहे. याबैठकी प्रसंगी प्रदेश सहप्रवक्ते नाना आमले,मार्गदर्शक प्रकाशजी दाते, निलेशनगापुरे, प्राश्रीराम पालकर, दिनेश सोळंके, वरुण ढोणे, गणेश गोलाईत, निलेश लांडगे, प्रविण निलखन , प्रभाकर बोळे, गजाननराव वानखडे, लक्ष्मण निखाडे, प्रविण वाघमारे, हरिष नावकार, रामदासखंडारे, बाळकृष्ण काळपांडे, सुनिल उंबरकार, दिलीप दाते, गणेश काळपांडे,विभा बोळे, श्रीकांत डाहे, ऋषी आमले, अशोक गाडगे, महेद्र काळे, गजानन धामणकर उपस्थित होते. संचालन प्रा.श्रीराम पालकर, प्रास्तविक प्रविण वाघमारे, आभार प्रदर्शन लक्षमणराव निखाडे यांनी केले. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सुचनेनुसार अकोला जिल्ह्यात गावागावत प्रत्येक तालुक्यात सावता परीषदेची बांधणी करणार अशी नवनियुक्त पदाधिकायींनी निर्धार केला.कार्यक्रमाला सावता सैनिक उपस्थित होते.