अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

By Admin | Updated: June 27, 2016 02:33 IST2016-06-27T02:33:50+5:302016-06-27T02:33:50+5:30

पातूर-वाशिम मार्गावरील घाटात आढळला मृतदेह.

Unidentified youth found dead; Suspicion of lynching | अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

पातूर (जि. अकोला) : पातूर-वाशिम मार्गावर असलेल्या घाटात आज सकाळी १0 वाजताचे दरम्यान अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. युवकाचे वय अंदाजे २५ ते २८ वर्षांच्या आसपास आहे. घाटात बकर्‍या चारावयास गेलेल्या मुलांना हा मृतदेह दिसताच, त्यांनी तेथून घाबरून पळ काढून गावातील नागरिकांना माहिती दिली. माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. जिन्स, टी शर्ट घातलेला युवक पालथा दिसून आला. या युवकाचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाल्याचे दिसून येत आहे. मृतदेह काळा ठिक्कर पडलेला असून, शरीरावर कुठल्याच मारहाणीच्या खुणा दिसून आल्या नसल्याने सदरचा प्रकार घातपाताचा असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव, सहा. ठाणेदार कांबळे, हेकाँ. सोहेल खान, प्रशांत उज्जैनकर, प्रशांत अढाऊ, सुनील चांदे आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Unidentified youth found dead; Suspicion of lynching