अस्वस्थतेतून निर्मित साहित्य चिरंतन - डहाके
By Admin | Updated: January 26, 2016 02:30 IST2016-01-26T02:30:16+5:302016-01-26T02:30:16+5:30
तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

अस्वस्थतेतून निर्मित साहित्य चिरंतन - डहाके
बुलडाणा : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुक्त संचाराव्दारे मानवी अस्वस्थेतून तयार होणारी साहित्यकृती कालातीत व चिरंतन ठरत असते. अशा साहित्यकृतीला पुरस्कृत करणे सजक व समंजस समाजाचे कर्तव्य असते. पुरस्कारामुळे लेखकाला आनंद मिळून त्याचे नाव नवलेखन निर्माणासाठीचे मनोबल वाढत असते. पुरस्कार लेखकाला नको ते लेखण करण्यासाठी उर्जा पुरविण्याची महत्वपुर्ण कामगिरी करीत असतात, असे विचार वसंत आबाजी डहाके यांनी भगवान ठग तुका म्हणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना मांडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द शायर तथा संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड तर औरंगाबादचे कवी, पत्रकार डी.बी.जगत्पुरीया, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, संयोजीका वैशाली भगवान ठग-जाधव व पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी अध्यक्ष तथा अतिथींनी अनुवादक, कवी, समीक्षक, भगवान ठग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलनाने उद्घाटन करून अतिथींचे स्वागत ङ्म्रीमती पार्वतीबाई ठग, वैशाली ठग-जाधव, ङ्म्रीराम जाधव यांनी केल्यानंतर संयोजिका वैशाली ठग यांनी भगवान ठग तुका म्हणो राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तथा कार्यक्रमाव्दारे भुमिका प्रास्ताविकाव्दारे विषद केली. प्रमुख अतिथी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याहस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानित साहित्यिकांनी सत्काराप्रित्यर्थ कृतज्ञता भाव म्हणून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर व साहित्यिक सुरेश साबळे यांचा सत्कार करण्यात आला.