बेरोजगार युवकांना मिळाले स्वयंरोजगाराचे बळ!
By Admin | Updated: January 27, 2016 23:21 IST2016-01-27T23:21:48+5:302016-01-27T23:21:48+5:30
मुद्रा योजने अंतर्गत १५ जानेवारीपर्यंत २३ लाख प्रकरणात कर्ज वाटप.

बेरोजगार युवकांना मिळाले स्वयंरोजगाराचे बळ!
बुलडाणा: मुद्रा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या शिशू, किशोर, तरुण या योजनेतून राज्यात लाखो बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराचे बळ मिळाले आहे. या योजनेंतर्गत १५ जानेवारी २0१६ पर्यंत राज्यात २२ लाख ९७ हजार १३७ प्रकरणे मंजूर झाली असून, ८ हजार ५२६.१0 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. उद्योजकांना अत्यंत कमी कागदपत्रात व तारणाशिवाय कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २0१५ महिन्यात सुरू केली. या योजनेंतर्गत ५0 हजार ते १0 लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. फेरीवाले, लघुउद्योजक, स्वयंरोजगार, व्यवसाय करणारे व विविध उत्पादन करू इच्छिणार्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मुद्रा योजनेची विशेषत: म्हणजे सदर कर्ज उद्योजकाला कोणत्याही तारणाशिवाय उपलब्ध होते. या योजनेतून शिशू योजनेत ५0 हजारापर्यंत, किशोर योजनेत ५0 हजार ते ५ लाख लाखांपर्यंत तर तरुण योजनेत ५ ते १0 लाखांपर्यंत कर्ज प्रदान करण्यात येत आहे. या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारले जात नसून, कर्ज परतफेडीची मुदत ५ वर्षापर्यंंत आहे. त्यामुळे योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या वतीने योजनेचा शुभारंभ झाल्यापासून १५ जानेवारी २0१६ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. यात राज्यातील विविध जिल्ह्यात मुद्रा योजनेतील ह्यशिशूह्ण योजनेत २१ लाख ६३ हजार प्रकरणे, ह्यकिशोरह्ण योजनेत १ लाख ६ हजार ६४३ प्रकरणे आणि ह्यतरुणह्ण योजनेत २७ हजार ४५९ प्रकरणे असे एकूण २२ लाख ९७ हजार १३७ प्रकरणे मंजूर झाली आहे. या प्रकरणांमध्ये ८ हजार ५२६.१0 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. विविध राष्ट्रीयीकृत बँकांमधून हे मुद्रा योजनेंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.