भूमिगत गटार योजना; ‘एसटीपी’ कार्यान्वित करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:55+5:302021-05-08T04:18:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या भूमिगत गटार योजनेतील मल:निस्सारण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ...

भूमिगत गटार योजना; ‘एसटीपी’ कार्यान्वित करा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या भूमिगत गटार योजनेतील मल:निस्सारण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी दिवसात हा प्रकल्प तातडीने सुरु करा, असे निर्देश महापौर अर्चना मसने यांनी जलप्रदाय विभागाला दिले.
भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा क्षेत्रातील शिलोडा येथे मल:निस्सारण केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले आहे. या केंद्राची गुरुवारी महापौर अर्चना जयंत मसने यांनी पाहणी केली. यावेळी जयंत मसने, मजीप्राचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, जलप्रदाय विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता एच. जी. ताठे, मजीप्राचे उपअभियंता अजय मालोकार, पी. एम. देशमुख, शाखा अभियंता बत्तुलवार, मनपाचे अभियंता नरेश बावणे, शैलेश चोपडे, आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मसने यांनी या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन प्लांटची पाहणी केली. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील नाल्यांमधून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी शेतीकरिता किंवा उद्योगांसाठी देण्यात येईल.