अनियंत्रित ऑटोची धावत्या शकुंतला रेल्वेला धडक; आठ जण जखमी
By Admin | Updated: March 24, 2015 01:00 IST2015-03-24T01:00:56+5:302015-03-24T01:00:56+5:30
खेर्डा - कारंजा रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळील घटना.

अनियंत्रित ऑटोची धावत्या शकुंतला रेल्वेला धडक; आठ जण जखमी
कारंजा लाड (जि. वाशिम) : मूतिर्जापूर येथून कारंजा मार्गे यवतमाळकडे जाणार्या शकुंतला रेल्वेच्या डब्याबर ऑटो जावून आदळल्याने ८ जण जखमी झाल्याची घटना सोमवार २३ मार्चला सकाळी १0 वाजताच्या सुमारास खेर्डा (कारंजा) रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ घडली. अमरावती जिल्हयातील वाढोणा रामनाथ येथील एम.एच २२ यू-२४१४ क्रमांकाचा ऑटो ७ प्रवाशी घेवून कारंजाकडे येत होता. याच दरम्यान शकुंतला रेल्वे कारंजा मार्गे यवतमाळकडे जात असताना ऑटो सरळ धावत्या रेल्वेच्या मागील डब्यावर जावून आदळला. त्यामुळे ऑटो जोरदार फेकल्या जावून नजिकच्या खड्डयामध्ये उलटला . या अपघातात ऋषिकेश महेंद्र माटोडे (वय १२), सुमित विठ्ठल माटोडे (वय १३), अमित विठ्ठल माटोडे सर्व रा. वाढोणा रामनाथ, वैष्णव वसंत मेटकर (वय १0) व प्रतिभा वसंत मेटकर (वय ३५) रा.वाघोळा, कमलाबाई गिरी (वय ७0) रा. चिंचखेड वढवी व मंगलाबाई रघुनाथ भगत (वय ३0) व चालक भुरू पठाण हे जखमी झाले. ऑटोचालक सोडून सर्व जखमींवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. जखमीमधील ऋषिकेश माटोडे व प्रतिभाबाई मेटकर यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय वाशिम येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदशर्नाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाय. एस. ठाकूर करीत करीत आहे. अपघाताची माहीती मिळताच र्मतिजापुर रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली. बातमी लीहेपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.