शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 3:16 PM

नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला: शहराच्या पडीत प्रभागांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाºया कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अदा केल्या जाणाºया देयकांमध्ये कपात करण्याचे धोरण आखले होते. कंत्राटदारांच्या माध्यमातून स्वत: दुकानदारी करणाºया काही नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात स्वच्छतेच्या मुद्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय प्रभाग तर खासगी सफाई कर्मचाºयांसाठी पडीत प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात स्वच्छतेची कामे करण्यास मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचा सूर लावला जातो. असे असले तरी पडीतप्रभागातही साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. काही ठराविक प्रभागातील नाल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ५१ पडीत भागांची निर्मिती केली. त्यासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. एका पडीत प्रभागासाठी ४८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासकीय असो वा पडीत प्रभागात नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसह खुल्या मैदानांची नियमित साफसफाई होणे अपेक्षित असताना आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसह खासगी कर्मचाºयांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात करण्यासोबतच पडीत प्रभागातील कंत्राटदारांच्या देयकात कपात करण्याचे धोरण आखले होते. त्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांवर सोपवली होती.झोन अधिकारी,‘एसआय’वर कारवाई नाहीच!शहरातील प्रशासकीय तसेच पडीत प्रभागातील दैनंदिन साफसफाईचा आढावा घेण्याची जबाबदारी झोन अधिकाºयांसह आरोग्य निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे. काही झोन अधिकारी सकाळी प्रभागांमध्ये पाहणी करताना दिसत असले तरी ते ठराविक पदाधिकारी व नगरसेवकांच्याच भागाची पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिक करतात. शहरात अस्वच्छतेचे किळसवाणे चित्र असताना मनपा प्रशासनाने झोन अधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.

कुंपण शेत खात आहे!सत्ताधारी भाजपने साफसफाईच्या नावाखाली तयार केलेले पडीत ५१ भाग सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कमाईचे साधन बनले आहेत. बहुतांश प्रभागातील कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाइकांचे आहेत. एका नगरसेवकाच्या दिमतीला १२ खासगी सफाई कर्मचारी नियुक्त असून, त्यांच्यावर महिन्याकाठी ९७ हजार रुपये खर्च होतो. काही प्रभाग पूर्णत: पडीत असल्याने त्या ठिकाणी ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या देयकावर महिन्याकाठी ३ लाख ८८ हजार रुपये खर्च केले जात असले तरी प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. नगरसेवक स्वत:ची खिसे भरण्यापोटी तीन किंवा चार मजुरांच्या मदतीने थातूरमातूर साफसफाईची कामे करत आहेत. कुंपणच शेत खात असल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिक विविध साथरोगांना बळी पडत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका