अनधिकृत होर्डिंग्ज; कंपन्यांच्या विरोधात तक्रार

By Admin | Updated: November 30, 2014 01:01 IST2014-11-30T00:53:59+5:302014-11-30T01:01:58+5:30

अकोला मनपा अधिका-यांची सिटी कोतवालीत धाव.

Unauthorized hoarding; Complaint against companies | अनधिकृत होर्डिंग्ज; कंपन्यांच्या विरोधात तक्रार

अनधिकृत होर्डिंग्ज; कंपन्यांच्या विरोधात तक्रार

अकोला: शहरात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासन अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या कंपन्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी सरसावले. शनिवारी रात्री उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध २१ कंपन्यांविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे.
अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहर विद्रूप होण्यासोबतच मनपाचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता, १६ डिसेंबरपर्यंत अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई पूर्ण करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मनपाला दिले. तसेच ज्या होर्डिंग्जवर राजकीय नेता, पदाधिकार्‍यांचे फोटो आहेत, अशा राजकीय पदाधिकारी वा कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्याचे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. अकोला मनपाने मात्र अद्यापपर्यंत एकही फौजदारी तक्रार नोंदवली नसल्याने शहरात अवैध होर्डिंंग्जचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत, मनपा प्रशासनाने रामदासपेठ पोलीस ठाणे व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या २१ होर्डिंग्जचे छायाचित्र गोळा केले. मनपाकडून रीतसर परवाना घेतला नाही, अशा कंपन्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी जी.एम. पांडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री धाव घेतली.

Web Title: Unauthorized hoarding; Complaint against companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.