अनधिकृत बांधकाम; कोचिंग क्लासेस संचालकांना मनपाचा ‘अल्टीमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:26 IST2020-03-07T13:26:39+5:302020-03-07T13:26:48+5:30
शुक्रवारी आयुक्तांनी त्यांचा मोर्चा शहरातील कोचिंग क्लासकडे वळविला.

अनधिकृत बांधकाम; कोचिंग क्लासेस संचालकांना मनपाचा ‘अल्टीमेटम’
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील प्रतिष्ठित उच्चभू्र नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या व महापालिका प्रशासनाने अनधिकृत ठरविलेल्या इमारतींवर आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाईचे हत्यार उपसले. शुक्रवारी आयुक्तांनी त्यांचा मोर्चा शहरातील कोचिंग क्लासकडे वळविला. एकाच दिवशी पाच कोचिंग क्लासेसवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. संबंधित संचालकांना तीन महिन्यांपूर्वीच स्वत:हून अतिक्रमण तोडण्याचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.
मनपाच्या नगररचना विभागाची नियमावली पायदळी तुडवित बांधकाम व्यावसायिकांसह प्रतिष्ठित नागरिकांनी मनमानीरीत्या निवासी व कमर्शियल कॉम्प्लेक्सचे निर्माण केले. संबंधितांना वारंवार सूचना व नोटीस जारी केल्यानंतरही इमारतींचे बांधकाम केल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ३ मार्चपासून कारवाईचा बडगा उगारला आहे.
शुक्रवारी आयुक्तांनी शहरातील पाच प्रतिष्ठित शिकवणी संचालकांच्या इमारतींचे मोजमाप करीत अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश देताच संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकली.