अनधिकृत बांधकाम पाडणारच!

By Admin | Updated: May 30, 2014 01:39 IST2014-05-30T01:38:15+5:302014-05-30T01:39:21+5:30

अकोला आयुक्तांची रोखठोक भूमिका; पुन्हा बजावल्या ३८ नोटीस

Unauthorized construction should be destroyed! | अनधिकृत बांधकाम पाडणारच!

अनधिकृत बांधकाम पाडणारच!

अकोला : नियमापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या इमारती नक्कीच धाराशायी करणार असल्याची रोखठोक भूमिका मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी स्पष्ट केली. अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेच्यावतीने पुन्हा ३८ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये आजपर्यंत १५२ पैकी ११४ इमारतींचे मोजमाप घेऊन संबंधित व्यावसायिकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. आयुक्तांच्या निर्णयामुळे १५२ पैकी कोण्याही इमारतीला दुप्पट दंड आक ारून त्यांना नियमित करण्याचा मुद्दा हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर रचना विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवित शहरातील इमारतींचे मंजूर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. यामध्ये रहिवासी इमारतींसह व्यावसायिक संकुलांचा समावेश आहे. १७ फेब्रुवारी रोजी मनपाची सूत्रे स्वीकारणार्‍या आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अनधिकृत बांधकाम बंद करण्याची पहिली नोटीस १२ मार्च रोजी बजावताच, बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. शहरातील १५२ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद करण्याची नोटीस जारी केल्यावर या संपूर्ण इमारतींच्या बांधकामाचे मोजमाप घेण्याचे आदेश नगर रचना विभागाला देण्यात आले. त्यानुषंगाने नगर रचना विभागाचे उपअभियंता राजेंद्र टापरे यांनी आजपर्यंत ११४ इमार तींची मोजमाप प्रक्रिया पूर्ण केली. आयुक्तांच्या भूमिकेचा बांधकाम व्यावसायिकांनी धसका घेतला असून, संभाव्य कारवाईतून वाचण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Unauthorized construction should be destroyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.