सेवानिवृत्त कर्मचा-याकडे लाखोची बेहिशेबी मालमत्ता
By Admin | Updated: March 4, 2015 01:57 IST2015-03-04T01:57:54+5:302015-03-04T01:57:54+5:30
आरोपीला अटक; वाशिम जिल्ह्यातील घटना.

सेवानिवृत्त कर्मचा-याकडे लाखोची बेहिशेबी मालमत्ता
वाशिम : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्ग दोनच्या एका सेवानवृत्त कर्मचार्याकडे जवळपास ६0 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत हा उघडकीस आले असून, याप्रकरणी आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आली.
मालेगाव येथील रामकिशोर शंकरलाल जयस्वाल यांनी उत्पादन शुल्क विभागाचे सेवानवृत्त निरिक्षक रामराव राजाराम शाहाकार यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली होती. त्यानुसार शाहाकार यांच्या संपत्तीची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वाशिम येथील पोलीस निरिक्षक विलास आर. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी १४ जुलै २0१४ ते ३ मार्च २0१५ या कालावधीत शाहाकार यांच्या संपत्तीची चौकशी केली. या चौकशीमध्ये शहाकार यांच्याकडे ५८ लाख २८ हजार ३७४ रूपयाची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. ही बेहिशेबी मालमत्ता शाहाकार यांनी ज्ञात व कायदेशीर मार्गाने कमाविलेल्या उत्पन्नापेक्षा ११७ टक्के जास्त आहे. याप्रकरणी शाहाकार यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करून, मंगळवारी अटक करण्यात आली.