शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:22 AM

अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देइमारतींचा भाग तातडीने हटवा; मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. या बांधकाम व्यावसायिकाने स्वत:च्या इमारतीचा अतिक्रमित भाग न तोडण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागात गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित मालमत्ताधारकांना अल्टिमेटम दिला आहे. येत्या १0 जानेवारीपर्यंत इमारतीचा भाग तातडीने हटवण्याचा इशारा मनपा आयुक्त वाघ यांनी दिला आहे.शहरातील नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला जात आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी ‘बॉटल नेक’ निर्माण झाल्यास भविष्यात वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांच्या संमतीने  जागा संपादित केली. रस्त्यासाठी जागा देण्याकरिता भाजप, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांच्या नेत्यांसह स्थानिक मालमत्ताधारकांनी पुढाकार घेतल्यामुळे रस्ता रुंदीकरण शक्य झाले. मनपाने रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. मात्र दरम्यानच्या काळात मनपाचा प्रशासकीय कारभार विस्कळीत झाल्याचा गैरफायदा घेत गोरक्षण रोडवरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास मनपा प्रशासनाला स्पष्ट शब्दात नकार दिला. हा प्रकार कमी म्हणून की काय, ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या नगररचना विभागात गावगुंडांना पाठवून संबंधित अधिकार्‍यांवर दबावतंत्राचा वापर करण्यापर्यंत मजल गाठली. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील तीन मालमत्ताधारकांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले. तीनही मालमत्ताधारकांना इमारतींचा भाग हटवण्यासाठी १0 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम देत गोरक्षण रोडचा तिढा निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाGaurakshan Roadगौरक्षण रोड