उद्धव ठाकरे आज अकोल्यात
By Admin | Updated: May 15, 2017 00:52 IST2017-05-15T00:52:26+5:302017-05-15T00:52:26+5:30
अकोला: शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या (सोमवार) सकाळी १०.३० वाजता अकोल्यात दाखल होत आहेत.

उद्धव ठाकरे आज अकोल्यात
अकोला: शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या (सोमवार) सकाळी १०.३० वाजता अकोल्यात दाखल होत आहेत. यावेळी अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यातील २० मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात येईल. दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका विशद क रतील.
अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. सुनील शिंदे यांच्यासह मुंबईतील नगरसेवकांचे पथक रविवारी अकोल्यात डेरेदाखल झाले.