उद्धव ठाकरे गुरुवारी अकोल्यात
By Admin | Updated: June 13, 2017 01:23 IST2017-06-13T00:55:26+5:302017-06-13T01:23:18+5:30
शेगाव येथे सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

उद्धव ठाकरे गुरुवारी अकोल्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १५ जून रोजी शेगाव येथे जाण्यासाठी अकोला विमानतळावर दाखल होत आहेत. विमानतळावरून ते थेट मोटारकारने शेगावकडे रवाना होतील. शेगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, या ठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १५ मे रोजी अकोल्यात दाखल झाले होते. त्यावेळी अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला होता. येत्या १५ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला संबोधित करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दाखल होत आहे. त्यासाठी ते विमानाने अकोला विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर थेट कारद्वारे शेगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करतील. नंतर सायंकाळी पुन्हा अकोला विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.