देवरी फाट्यानजीक वीज पडून दोन युवक गंभीर
By Admin | Updated: June 28, 2016 02:21 IST2016-06-28T02:21:23+5:302016-06-28T02:21:23+5:30
देवरी फाट्यानजीक रोहणखेड घडली घटना.

देवरी फाट्यानजीक वीज पडून दोन युवक गंभीर
आकोट (जि. अकोला) : आकोट-अकोला मार्गावरील देवरी फाट्यानजीक रोहणखेड मार्गावर वीज पडून दोन युवक गंभीर झाले आहेत. ही घटना २७ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. दोन्ही युवकांना अकोल्याला उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.
मोटारसायकलने अरविंद झटाले व राम पोतले हे दोघेजण अकोला येथे जात होते. दरम्यान, पाऊस व विजा कडाडत असल्यामुळे ते रोहणखेड मार्गावरील वळणावर झाडाखाली थांबले. तेवढय़ात त्यांच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर झाले आहेत. त्यांना त्वरित पुढील उपचाराकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले आहे.
.