मारहाणप्रकरणी भावंडांना दोन वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: May 16, 2017 02:07 IST2017-05-16T02:07:46+5:302017-05-16T02:07:46+5:30
अकोला: बार्शीटाकळी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोघे भाऊ असलेल्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मारहाणप्रकरणी भावंडांना दोन वर्षांची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बार्शीटाकळी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोघे भाऊ असलेल्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दोघांनाही दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे. बार्शीटाकळी येथील रहिवासी दुर्योधन गवई यांना येथीलच रहिवासी असलेल्या विशाल गवई आणि युवराज गवई या दोन भावांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये बार्शीटाकळी पोलिसांनी सदर जखमी इसमाच्या वैद्यकीय अहवालावरून तसेच दुर्योधन गवई यांचे बंधू शुद्धोधन गवई यांच्या तक्रारीवरून युवराज गवई आणि विशाल गवई या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बार्शीटाकळी पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असून, युवराज गवई आणि विशाल गवई या दोन भावंडांविरुद्ध कलम ३२४ अन्वये आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन्ही भावंडांना दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. विनोद फाटे यांनी कामकाज पाहिले.