शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणातील आरोपीस दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:30 IST

अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चतारी येथील रहिवासी एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चतारी येथील रहिवासी एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १० हजार रुपये दंड ठोठावला असून दंडाची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणूण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.पातूर तालुक्यातील चतारी येथील रहिवासी देवसिंह लक्ष्मन सदार (५०) याने याच परिसरातील रहिवासी एका मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना ६ मार्च २०१४ रोजी घडली होती. या प्रकरणाची तक्रार मुलीने चान्नी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी देवसिंह लक्ष्मन सदार याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ आणि बालकांचे संरक्षण अधिनीयमाच्या कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सादर केले. त्यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी देवसिंह लक्ष्मन सदार याच्याविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला कलम ३५४ अन्वये दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला, दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे तर बालकांचे संरक्षण अधिनीयमाच्या कलम १२ अन्वये दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे. दंडाची १० हजार रुपयांची रक्कम पिडीतेस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. शाम खोटरे यांनी कामकाज पाहीले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयMolestationविनयभंग