इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा मृत्यू !
By Admin | Updated: August 15, 2016 02:44 IST2016-08-15T02:44:53+5:302016-08-15T02:44:53+5:30
अकोला जवळील गुडधी येथील घटना.

इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा मृत्यू !
अकोला, दि. १४: दोन वर्षीय मुलीचा इमातीवरू न खाली पडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना शनिवारी अकोलापासून ५ कि.मी. अंतरावरील गुडधी येथे घडली. रमेश श्रीराम पावडे यांचे गुडधी येथे स्लॅबचे घर आहे. दोन वर्षीय केतकी चे वडील संदीप पावडे कामाला गेले होते. आई दुपारी घरात स्वयंपाक करीत असताना केतकी जिन्याच्या पायर्या चढत इमारतीच्या छतावर पोहोचली, छतावर पोहोचल्यावर तिला खाली उतरात येत नसल्याने ती छताच्या भिंतीवरू न खाली वाकून बघत असताना केतकीचा तोल गेला आणि ती इमातीवरू न १२ फुट खाली डोक्यावर पडली. डोक्यावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.