अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:11 PM2021-01-14T17:11:13+5:302021-01-14T17:11:25+5:30

Accident News मूर्तिजापूर - पिंजर मार्गावर सालासर लॉन जवळ १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.

Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

googlenewsNext

मूर्तिजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना मूर्तिजापूर - पिंजर मार्गावर सालासर लॉन जवळ १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.
          पिंजर - मूर्तिजापूर मार्गाने पंकज वाकोडे (३४) राहणार आरखेड हा दुचाकीस्वार  दुचाकीने मूर्तिजापूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी इसम हा बेशुद्ध अवस्थेत असुन त्याच्या मोबाईलला कोड लॉक असल्याने काही वेळ त्याच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नव्हता नसल्याची जखमीला बेशुद्ध अवस्थेत येथील वंदेमातरम व वंचित बहूजन आपत्कालीन पथकाच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. डोक्याला जोरदार दुखापत झाल्याने वृत्त लिहिस्तोवर सदर जखमी इसम बेशुद्ध अवस्थेत होता. पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.