शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 13:14 IST

टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगिरनजीकच्या राजहंस ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देसचिन विठ्ठल पवार (रा.काखेड, ता. बार्शीटाकळी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.सचिन विठ्ठल पवार हे त्यांच्या एम.एच. ३० यू ७८१३ क्रमांच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात होते. टँकरच्या चालकाने सचिन पवार यांच्या दुचाकीस ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली.

बाभूळगाव जहाँगिर (अकोला ): भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी  झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगिरनजीकच्या राजहंस ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी घडली. सचिन विठ्ठल पवार (रा.काखेड, ता. बार्शीटाकळी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे, तर सुरेश जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड येथील सचिन विठ्ठल पवार व सुरेश जाधव हे दोघे त्यांच्या एम.एच. ३० यू ७८१३ क्रमांच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात होते. दरम्यान, सकाळी ९ वाजताचे दरम्यान एन.एल.०१ एन-११०१ क्रमांच्या टँकरच्या चालकाने सचिन पवार यांच्या दुचाकीस ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सचिन पवार चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळित झाली होती.  एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन विठ्ठल पवा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. जखमी झालेल्या सुरेश जाधव यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात