अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST2021-07-18T04:14:28+5:302021-07-18T04:14:28+5:30

पातूर : पातूर-वाशिम महामार्गावरील बोडखा-चिंचखेडनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडवून दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १६ जुलै रोजी ...

Two-wheeler killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पातूर : पातूर-वाशिम महामार्गावरील बोडखा-चिंचखेडनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडवून दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मोहम्मद कलीम मोहम्मद सलीम (रा. साळणीपूरा पातूर) असे मृतकाचे नाव आहे.

पातूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम चिंचखेड-बोडखानजीक शुक्रवार, १६ जुलैच्या रात्री १० वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने (एमएच ३० एक्यू ७६११) क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोहम्मद कलीम मोहम्मद सलीम (रा. साळणीपुरा, पातूर) याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस व काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दुले खान युसूफ खान, शेख नईम, अनिक पटेल, मोहम्मद खा रूम खा यांनी मृतदेह पातूर पोलीस स्टेशनच्या वाहनात अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठविला. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in unidentified vehicle collision