दुचाकीस्वार मुलास ट्रकने चिरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:38+5:302021-06-28T04:14:38+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पंचवटी हॉटेलसमोर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना रविवारी (दि. २७) दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान घडली. ...

Two-wheeler boy crushed by truck! | दुचाकीस्वार मुलास ट्रकने चिरडले!

दुचाकीस्वार मुलास ट्रकने चिरडले!

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पंचवटी हॉटेलसमोर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना रविवारी (दि. २७) दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान घडली. ओम प्रदीप बोबडे (१६, रा.पारद) असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील पारद येथील रहिवासी असलेला ओम प्रदीप बोबडे हा काही कामानिमित्त मूर्तिजापूर येथे आला होता. दरम्यान, दुचाकीत (क्र. एमएच २७ सीक्यू १६७१) पेट्रोल भरण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपावर गेला असता अमरावतीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (क्र एमपी २८ एच ०९८५) धडक दिली. त्यात ओम हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वंचित आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला. अपघातासंदर्भात अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नागोराव भांगे व पोलीस शिपाई मोहन भेंडारकर करीत आहेत. (फोटो)

Web Title: Two-wheeler boy crushed by truck!