दुचाकीचा अपघात; युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:41 AM2020-07-06T10:41:18+5:302020-07-06T10:42:00+5:30

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला धडकली.

Two-wheeler accident; Death of a youth | दुचाकीचा अपघात; युवकाचा मृत्यू

दुचाकीचा अपघात; युवकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हाता : उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत हाता येथील रामभाऊ खाळपे यांचा मुलगा उमेश हा बहिणीसह दुचाकीने एका लग्नातून परत येत असताना, त्याची दुचाकी झाडावर आदळली. यात तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान ५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.
उमेश खाळपे हा बहिणीसह एका लग्नसमारंभात गेला होता. लग्नसमारंभ आटोपून तो बहिणीसह दुचाकीने गावी परतत असताना, वानखेड फाट्याजवळ त्याचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला धडकली. यात उमेश व त्याची बहीण गंभीर जखमी झाले. उमेशला तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; परंतु ५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बहिणीवरसुद्धा उपचार सुरू आहेत. गावात दु:खद घटना घडल्यामुळे गावकऱ्यांवर शोककळा पसरली होती. उमेश याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.

 

Web Title: Two-wheeler accident; Death of a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.