दुचाकीची समोरासमोर धडक; २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:37+5:302021-07-07T04:23:37+5:30
कंझरा रोडवरील सालासर मंगल कार्यालयाजवळ दुचाकीच्या समोरासमोर धडकेत रेडवा तालुका बार्शीटाकळी येथील रोहित वसंत पवार (२८) हा आपल्या दुचाकी ...

दुचाकीची समोरासमोर धडक; २ जखमी
कंझरा रोडवरील सालासर मंगल कार्यालयाजवळ दुचाकीच्या समोरासमोर धडकेत रेडवा तालुका बार्शीटाकळी येथील रोहित वसंत पवार (२८) हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बीएम ००७४ ने मूर्तिजापूर येथील शेती कामे आटोपून गावी जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३० ए एल २६५४ ने जोरदार धडक दिली त्यात रोहित पवार हा गंभीररीत्या जखमी झाला तर विरुद्ध दिशेने येणारा दुचाकीस्वार सुरेश रमेश गवई (२२) राहणार हिरपूर हा किरकोळ जखमी झाला. सुरेश हा घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुरेश गवई याच्याविरुद्ध २७९,३३७, व महाराष्ट्र मोटर कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय शिंगणे व महेश पिंजरकर करीत आहेत.