व-हाडात पावसाचे दोन बळी

By Admin | Updated: July 11, 2016 03:12 IST2016-07-11T03:09:27+5:302016-07-11T03:12:31+5:30

अकोल्यात इसम वाहून गेला : बुलडाण्यात भिंत अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू.

Two-two rainy monsoons | व-हाडात पावसाचे दोन बळी

व-हाडात पावसाचे दोन बळी

अकोला /बुलडाणा/ वाशिम: गेल्या दोन दिवसांपासून पश्‍चिम वर्‍हाडात पावसाची रिपरिप सुरु असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात पठार नदिला आलेल्या पुरामध्ये बाबुराव ज्ञानदेव घनबहादूर हा इसम वाहून गेला तर, बुलडाणा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे. या पावसाने धरणाची पातळी मात्र वाढली नाही.
तीन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाने तळ ठोकला आहे. रविवारी दुपारी पावसाचा वेग वाढल्याने रविवारी सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात एकूण ६0.३ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली.
बुलडाणा जिल्ह्यात १0 जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १७८.३ मि.मी. पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात ४५ मि.मी. झाला. जळगाव जामोद तालुक्यात भिंत अंगावर कोसळून कमलाबाई हरिभाऊ नारखेडे ही महिला ठार झाली.
वाशिम जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम असून, रविवारी सकाळपर्यंत सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Two-two rainy monsoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.