अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले
By Admin | Updated: September 7, 2014 23:58 IST2014-09-07T23:58:26+5:302014-09-07T23:58:26+5:30
उरळ पोलिसांची कारवाई.

अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले
उरळ: स्थानिक पोलिसांनी रविवार, ७ सप्टेंबर रोजी विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक निंबा फाटा येथे पकडून त्यांच्याकडून एकूण २३,८00 रुपयांचा दंड वसूल केला.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कवठा येथून अकोल्याकडे विना रॉयल्टी रेतीची अवैधपणे वाहतूक करीत असलेल्या एम. एच. ३0 ए.बी. २९११ व एम. एच. ३0 ए. ३७११ क्रमांकाचे दोन ट्रक जमादार सुरेश तायडे यांनी निंबा फाटा येथे पकडले.
यावेळी शरद देवराव मोरे (रा. लोहारा) व शेख अन्वर खैरमोहम्मद (रा. बाळापूर) या ट्रकचालकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ट्रक मालकांकडून अनुक्रमे ९,४00 रु. व १४,४00 रु. असा एकूण २३,८00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.