शालेय पोषण आहाराचा दोन ट्रक तांदूळ जप्त

By Admin | Updated: January 11, 2015 01:26 IST2015-01-11T01:21:45+5:302015-01-11T01:26:16+5:30

अकोला पोलिसांची कारवाई; पाच लाख किमतीचा २८५ क्विंटल तांदूळ.

Two Truck Rice of School Nutrition Dangers Riches | शालेय पोषण आहाराचा दोन ट्रक तांदूळ जप्त

शालेय पोषण आहाराचा दोन ट्रक तांदूळ जप्त

अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या अकोलास्थित वसाहतमधील एका गोदामातून शालेय पोषण आहाराचा सुमारे २८५ क्विंटल तांदूळ शनिवारी नागपूर येथे काळय़ाबाजारात नेत असताना पोलिसांनी पकडला. तांदळाचे दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एमआयडीसीतील एका गोदामातून एम एच ३0 एबी १३५४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे पोते भरण्यात आले असून, हा ट्रक नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी एमआयडीसी गाठून ट्रकचा पाठलाग करून हा ट्रक बाभूळगाव जहाँगीरनजीक पकडला. ट्रक पकडल्यानंतर सुमारे १५0 क्विंटल तांदूळ पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक व तांदळाची चौकशी सुरू असतानाच आणखी एका ट्रकमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एम एच 0४ डीडी ८६0८ क्रमांकाचा ट्रक पकडून यामधूनही सुमारे १३५ क्विंटल तांदूळ जप्त केला. दोन्ही ट्रकमध्ये सुमारे २८५ क्विंटल शालेय पोषण आहाराचा तांदूळ नागपूर येथे काळय़ाबाजारात जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केल्याने रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ट्रकचालक बोरगाव मंजू येथील रहिवासी रामधन शंकर वानखडे व वाशिम बायपास येथील रहिवासी मुजम्मिल खान मजहर खान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही ट्रकचालकांकडून माहिती घेतली असता ट्रकचा मालक गोपाल कदम असल्याचे समोर आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस व जिल्हा पुरवठा विभागाद्वारे सुरू आहे.

Web Title: Two Truck Rice of School Nutrition Dangers Riches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.