दोन विद्यार्थ्यांचा बंधा-यात बुडून मृत्यू!
By Admin | Updated: August 3, 2016 02:21 IST2016-08-03T02:21:22+5:302016-08-03T02:21:22+5:30
अकोला जिल्हय़ातील बोरगाव मंजू येथील घटना.

दोन विद्यार्थ्यांचा बंधा-यात बुडून मृत्यू!
अकोला : दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बंधार्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी जिल्हय़ा तील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या बोरगाव मंजू येथे दुपारी २.३0 वा. घडली. या विद्यार्थ्यांचे दप्तर घटनास्थळी आढळल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांनी दिली. अनिल अरुण लागे (इयत्ता सातवी) आणि श्याम संजय सोळंके (इयत्ता सहावी) अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे असून ते बोरगाव मंजू येथील परशूराम नाईक विद्यालयात शिकत होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत.