शहरातील दोन ठाणेदार कार्यमुक्त
By Admin | Updated: April 26, 2017 01:52 IST2017-04-26T01:52:17+5:302017-04-26T01:52:17+5:30
अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले.

शहरातील दोन ठाणेदार कार्यमुक्त
अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. आता डाबकी रोड पोलीस स्टेशनचा प्रभार भारसाकळे यांच्याकडे देण्यात आला असून, रामदासपेठ पोलीस स्टेशनचा प्रभार वाहतूक शाखेचे शिरीष खंडारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची नागपूर ग्रामीण येथे बदली झाली असून, त्यांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले.
या पोलीस स्टेशनचा प्रभार शिरीष खंडारे यांच्याकडे देण्यात आला आहे, तर डाबकी रोड पोलीस स्टेशनचे विनोद ठाकरे यांचीही बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करून या ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक भारसाकळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
खुर्च्या नेल्याची चर्चा
डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी खुर्च्या नेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती. या पोलीस ठाण्यातील चार खुर्च्या पोलीस अधिकाऱ्याने नेल्यामूळे वादही निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्याचेही सांगण्यात येत असून, हा प्रकार घडला की नाही, यासंदर्भात पोलीस खात्यात शंका व्यक्त करण्यात येत आहेत.