दोन ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार

By Admin | Updated: December 6, 2015 02:16 IST2015-12-06T02:16:15+5:302015-12-06T02:16:15+5:30

चिचखेडजवळील घटना; दोघे जखमी.

Two people killed in the truck accident | दोन ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार

दोन ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार

कुरूम (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चिचखेड फाट्यादरम्यान एका ढाब्याजवळ परस्परविरुद्ध दिशांनी येणार्‍या दोन ट्रकची ५ डिसेंबरच्या रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. एम.एच.0४ ई.एल. १९५८ क्रमांकाचा ट्रक व विरुद्ध दिशेने येणारा एम.एच.0४ एन. ५२0१ क्रमांकाच्या ट्रकची नवसाळ ते चिचखेड फाट्यादरम्यान बंद पडलेल्या ढाब्यासमोर शनिवारी रात्री जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका इसमाचा ट्रकमध्ये फसल्याने मृत्यू झाला व अन्य दोघेजण जखमी झाले.मृतक व जखमींची नावे समजू शकली नाहीत. या घटनेचे वृत्त समजताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक वाघमारे त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचार्‍यांसोबत तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रकमधील दोन्ही जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने अमरावतीच्या रुग्णालयात रवाना केले. हे वृत्त लिहिपर्यंंंत माना पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Two people killed in the truck accident