पंचायत समिती पोटनिवडणूकीत दोन उमेदवारी अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:08+5:302021-07-07T04:24:08+5:30
दोन जिल्हा परिषद गटासाठी व चार पंचायत समिती गणांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी दाखल करण्यात आले. २ जिल्हा परिषद ...

पंचायत समिती पोटनिवडणूकीत दोन उमेदवारी अर्ज बाद
दोन जिल्हा परिषद गटासाठी व चार पंचायत समिती गणांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी दाखल करण्यात आले. २ जिल्हा परिषद गट लाखपुरी व बपोरी गटासाठी १० उमेदवारांनी ११ नामनिर्देशनपत्र दाखल केले ते ११ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर लाखपुरी, कानडी, माना व बोर्टा या ४ पंचायत गणांसाठी १९ उमेदवारांनी २१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी माना गणातील वसू प्रमोद गणेशराव अपक्ष यांनी एकाच वेळी दोन उमेदवारी दाखल केले होते. दोन्ही उमेदवारी अर्जावर एकच सूचक असल्याने त्यांचा एक अर्ज बाद ठरला. त्याच गणातील अपक्ष महिला उमेदवार असलेल्या रत्नकला खंडारे श्रीराम यांचाही उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी बाद ठरविला. जिल्हा परिषद गटातील ११ नामनिर्देशनपत्र कायम आहेत.