मूर्तिजापुरात नॅरोगेज रेल्वे मार्गावर दोन नवीन पूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:12 IST2017-08-26T01:11:00+5:302017-08-26T01:12:09+5:30

मूर्तिजापूर शहरातून मूर्तिजापूर-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे लाइन गेलेली आहे. या लाइनवर दोन पूल व रस्ता होण्याचे संकेत आहेत. त्याविषयी खासदार संजय धोत्रे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून पुलाचे नियोजन व आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे. 

Two new bridges on the Naurogge railway route in Murthyjapur! | मूर्तिजापुरात नॅरोगेज रेल्वे मार्गावर दोन नवीन पूल!

मूर्तिजापुरात नॅरोगेज रेल्वे मार्गावर दोन नवीन पूल!

ठळक मुद्देमूर्तिजापूर-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे लाइनखासदार संजय धोत्रे यांनी केली शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातून मूर्तिजापूर-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे लाइन गेलेली आहे. या लाइनवर दोन पूल व रस्ता होण्याचे संकेत आहेत. त्याविषयी खासदार संजय धोत्रे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून पुलाचे नियोजन व आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे. 
  नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. मूर्तिजापूरला दोन्ही मार्गावर दोन पुलांची निर्मिती होऊन, त्या खालून रस्ते होऊ शकतात. भारतीय ज्ञानपीठ तसेच रेल्वे स्टेशनवरून बस स्टँड, बाजार समितीमागून सिंधी कॉलनीजवळील रेल्वे रुळाखालून नवीन पुलाची निर्मिती केल्यास त्याखालून निघणार्‍या रस्त्यावरून वाहतुकीला सोयीचे होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक या मार्गावर वळून गर्दी कमी होईल.
या दोन्ही पुलांची आर्थिक तरतूद व नियोजन आताच करून मूर्तिजापूरच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी खा. संजय धोत्रे यांनी रेल्वे बोर्ड भुसावळ विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. खासदार धोत्रे यांच्याकडे जनमंच नागपूर, मूर्तिजापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, तसेच कृ ष्णराव गावंडे,  शेकापचे विजय गावंडे, शेतकरी संघटनेचे विजय लोडम, सेवकराम लहाने, देवीदास बांगड, पतंजलीचे पुंडलिक भारंबे, भारतीय किसान संघाचे नरेंद्र तिडके, ग्राहक संघाचे एस. एन. जाट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोपाल तायडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, विश्‍वनाथ गावंडे, नितीन गावंडे, अरुण बोंडे यांनी मागणी केली होती. 

Web Title: Two new bridges on the Naurogge railway route in Murthyjapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.