आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या
By Atul.jaiswal | Updated: May 12, 2024 14:34 IST2024-05-12T14:34:08+5:302024-05-12T14:34:51+5:30
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५५ सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १८ मे रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून ११:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.१५ वाजता बालेश्वरला पोहोचेल.

आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या
अकोला : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने सीएसएमटी मुंबई- बालेश्वर (ओडिसा) सुपरफास्ट स्पेशल व पुणे-बालेश्वर (ओडिसा) सुपरफास्ट स्पेशल या दोन उन्हाळी विशेष चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५५ सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १८ मे रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून ११:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.१५ वाजता बालेश्वरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१०५६ सुपरफास्ट स्पेशल सोमवार, २० मे रोजी ०९:३० वाजता बालेश्वरहून निघेल आणि सीएसएमटी मुंबईला दुसऱ्या दिवशी २२:५० वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही दिशांनी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबा असणार आहे.
पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या
गाडी क्रमांक ०१४५१ पुणे-बालेश्वर सुपर फास्ट स्पेशल पुण्याहून शनिवार १८ मे रोजी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:३० वाजता बालेश्वरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४५२ बालेश्वर-पुणे सुपरफास्ट स्पेशल बालेश्वर येथून सोमवार, २० मे रोजी ०९.०० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी १९.३० वाजता पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशांनी दौंड कॉड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकराधरपूर, टाटानगर आणि खरगपुर या स्थानकांवर थांबणार आहे.