समाजकल्याणच्या आणखी दोन योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:28 IST2017-08-24T01:28:45+5:302017-08-24T01:28:45+5:30
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले.

समाजकल्याणच्या आणखी दोन योजना मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले.
समाजकल्याण विभागाकडून लाभार्थींच्या योजना गेल्या दोन वर्षांत रखडल्या. त्यामुळे गेल्यावर्षी निवड झाल्यानंतरही लाभार्थींना वस्तूंचे वाटप झाले नाही. चालू वर्षी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांना लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांसाठी लाभार्थी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये लाभार्थींना एचडीपीई पाइप, प्लास्टिक ताडपत्री, पेट्रोकेरोसिन पंप, डीझल पंप, इलेक्ट्रिक पंप, पीव्हीसी पाइप, दिव्यांग लाभार्थींना पिठाची गिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीनचा पुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांसाठी १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासोबतच मंजुरी प्रक्रियेत असलेल्या २0 लाख रुपये निधीतून टिनपत्रे, तर २९ लाख रुपयांतून रोटाव्हेटर वाटप योजनेला मंजुरी मिळाली. त्या योजनांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आली. सोबतच ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देणे, दिव्यांगांसाठी शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृहांची निर्मिती करणे, रॅम्प निर्मिती करण्याचेही नियोजन करण्यात आले. सभेला सदस्य सम्राट डोंगरदिवे, सरला मेश्राम, श्रीकांत खोणे, बाळकृष्ण बोंद्रे, रूपाली अढाऊ, मंजुळा लंगोटे, पद्मा भोसले यांच्यासह प्रभारी समाजकल्याण अधिकारी जवादे उपस्थित होते.
दलित वस्ती कामांचे पुन्हा नियोजन
जिल्हय़ातील शेकडो गावांमध्ये दलित वस्ती विकास कामांचा निधी वाटप करताना अनेक गावांतील गरजू वस्त्या वंचित आहेत. त्या वस्त्यांमध्ये विकास कामे करण्यास प्राधान्य देत कामांचे पुन्हा नियोजन करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार लवकरच नियोजन केल्या जाणार आहे.