अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०६ पॉझिटिव्ह, ४६ कोरोनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 07:51 PM2021-02-22T19:51:36+5:302021-02-22T19:51:45+5:30

CoronaVirus in Akola २२ फेब्रुवारी रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील २१ वर्षीय युवक व पातूर येथील ५८ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३५५ वर गेला आहे.

Two more died in Akola district, 206 positive, 46 corona free | अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०६ पॉझिटिव्ह, ४६ कोरोनमुक्त

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०६ पॉझिटिव्ह, ४६ कोरोनमुक्त

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाच कहर सुरुच असून, सोमवार, २२ फेब्रुवारी रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील २१ वर्षीय युवक व पातूर येथील ५८ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३५५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७५, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ३१ असे एकूण २०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १४,१४१ वर पोहोचली आहे. दरम्यान, आणखी ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २८, अकोट येथील २०, जीएमसी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कान्हेरी सरप व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, देवरावबाबा चाळ, कौलखेड, खडकी, मोठी उमरी, डाबकी रोड व उगवा येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, सुधीर कॉलनी व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, तापडीया नगर, मलकापूर, केशव नगर, सिंधी कॅम्प, अमृतवाडी,दगडी पूल, बलोदे लेआऊट, गजानन पेठ, मराठा नगर, बाजोरीया नगर व अकोट येथील प्रत्येकी दोन, उरळ, एपीएमसी मार्केट, गोकूळ कॉलनी, रवी नगर, विद्या नगर, जूने शहर, निबंधे प्लॉट, गंगाधर प्लॉट, चांदुर, तोष्णीवाल लेआऊट, सातव चौक, शिवाजी नगर, गड्डम प्लॉट, व्दारका नगर, खोलेश्वर, गजानन नगर, अजिंक्य नगर, अकोट फैल, खदान नाका, राऊतवाडी, लहरीया नगर, मलकापूर, गंगा नगर, राजपूतपुरा, निमवाडी, सिंदखेड ता. बार्शीटाकळी, माना ता.मुर्तिजापूर, कृष्ण नगरी, पैलपाडा बोरगाव मंजू व माणिक टॉकीज येथील प्रत्येकी एक अशा १६५ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मुर्तिजापूर येथील पाच, तर जांभा बु. ता.मुर्तिजापूर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पातूर व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

२१ वर्षीय युवक ५८ वर्षीय पुरुष दगावला

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणर्यांची संख्या वाढतच असून, सोमवारी तिवसा ता. बार्शीटाकळी येथील २१ वर्षीय युवक व पातूर येथील ५८ वर्षीय पुरुष या दोन रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या दोघांनाही अनुक्रमे २१ व १९ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये ३१ पॉझिटिव्ह

रविवार २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या ३३९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३४,३२० चाचण्यांमध्ये २४३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

४६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, अशा एकूण ४६ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.

२,१५५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,१४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,६३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,१९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आता सद्यस्थिती

Web Title: Two more died in Akola district, 206 positive, 46 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.