आणखी दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह, १७४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 06:51 PM2020-10-02T18:51:20+5:302020-10-02T18:51:31+5:30

CoranaVirus in Akola दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४१ वर गेला आहे.

Two more died; 23 new positives, 174 corona free |  आणखी दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह, १७४ कोरोनामुक्त

 आणखी दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह, १७४ कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, २ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील एक व बार्शीटाकळी तालुक्यातील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७५७२ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आणखी १०६ आणि शुक्रवारी ६८ अशा एकूण १७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जणांसह संतोष नगर येथील दोन, कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवतवाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी राधाकिसन प्लॉट येथील दोन, कौलखेड, जानोरी, शिवनगर, अंबिका नगर, खडकी, बार्शीटाकळी नवीन बसस्टँड जवळ येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

गीतानगर, तिवसा येथील दोघे दगावले
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, शुक्रवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गीतानगर येथील ७२ वर्षीय पुरुष असून, त्यांना २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिवसा येथील ६२ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. त्यांना १९ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले होते.

१७४ जणांची कोरोनावर मात
गुरुवारी रात्री अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनीक येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच आणि होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १०० अशा एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर अकोला येथून १५, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, अवधाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रेजीन्सी येथून नऊ, तर हॉटेल स्कायलार्क येथून सहा अशा एकूण ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१,१२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५७२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६२०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more died; 23 new positives, 174 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app