आणखी दोघांचा मृत्यू, २०६ पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:16+5:302021-02-23T04:29:16+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

आणखी दोघांचा मृत्यू, २०६ पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २८, अकोट येथील २०, जीएमसी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कान्हेरी सरप व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, देवरावबाबा चाळ, कौलखेड, खडकी, मोठी उमरी, डाबकी रोड व उगवा येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, रामदास पेठ, न्यू तापडिया नगर, सुधीर कॉलनी व गीता नगर येथील प्रत्येकी तीन, तापडिया नगर, मलकापूर, केशव नगर, सिंधी कॅम्प, अमृतवाडी, दगडी पूल, बलोदे लेआऊट, गजानन पेठ, मराठा नगर, बाजोरीया नगर व अकोट येथील प्रत्येकी दोन, उरळ, एपीएमसी मार्केट, गोकुळ कॉलनी, रवी नगर, विद्या नगर, जुने शहर, निबंधे प्लॉट, गंगाधर प्लॉट, चांदुर, तोष्णीवाल लेआऊट, सातव चौक, शिवाजी नगर, गड्डम प्लॉट, व्दारका नगर, खोलेश्वर, गजानन नगर, अजिंक्य नगर, अकोट फैल, खदान नाका, राऊतवाडी, लहरीया नगर, मलकापूर, गंगा नगर, राजपूतपुरा, निमवाडी, सिंदखेड ता. बार्शीटाकळी, माना ता. मूर्तिजापूर, कृष्ण नगरी, पैलपाडा बोरगाव मंजू व माणिक टॉकीज येथील प्रत्येकी एक अशा १६५ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मूर्तिजापूर येथील पाच, तर जांभा बु. ता.मूर्तिजापूर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पातूर व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
२१ वर्षीय युवक ५८ वर्षीय पुरुष दगावला
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच असून, सोमवारी तिवसा ता. बार्शीटाकळी येथील २१ वर्षीय युवक व पातूर येथील ५८ वर्षीय पुरुष या दोन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोघांनाही अनुक्रमे २१ व १९ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये ३१ पॉझिटिव्ह
रविवार २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या ३३९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत झालेल्या एकूण ३४,३२० चाचण्यांमध्ये २४३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
४६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, अशा एकूण ४६ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
२,१५५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,१४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,६३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २,१९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.