शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लुबाडणारे दोघे गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 20:14 IST

दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून  केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या  टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही  रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात  आला.

ठळक मुद्देचोहोट्टा येथे दहीहांडा पोलिसांची कारवाईआरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून  केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या  टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही  रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात  आला. आरोपींना अकोट न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना  दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.   ही टोळी औरंगाबाद जिल्हातील असून,  अकोला येथील काही लोकांच्या मदतीने दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून  लोकांना लुबाडत होते. केळीवेळी येथील गजानन महादेव शिवरकार यांच्या एका मित्राने सांगितले, की आ पल्याकडे पैसे दुप्पट करून देणारी माणसे आहेत. शिवरकार यांचा मोह  वाढल्याने  त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी पैसे देण्याचे ठरले. या टोळी तील चौघे जण एका कारने चोहोट्टा बाजार येथे आले. त्यातील विजय बोरसे,  (३७) रा. श्रीरामपूर जि. औरंगाबाद आणि अजीज याकुब कासकरे (५६) रा.  काजली जि. औरंगाबाद हे केळीवेळी येथील गजानन शिवरकार यांच्या घरी गेले.   शिवरकार यांच्याकडे १ लाख ७५ हजार रुपयेच होते. या रकमेचे दुप्पट करण्यास  त्या दोघांनी नकार दिला. तडजोडीनंतर सायंकाळी ही रक्कम दुप्पट करण्यास दोघेही  तयार झाले. त्यांनी शिवरकार यांना चोहोट्टा बाजार येथे चालण्याविषयी सांगितले.  शिवरकार यांनी ही रक्कम घरातील कपाटात ठेवली. घराचे इतर दरवाजे बंद  करण्यासाठी शिवरकार गेले असता, या दोन्ही चोरट्यांनी कपाटातील १ लाख ७५  हजार रुपयांची रक्कम लंपास केली. तेथून तिघेही दुचाकीने चोहोट्टा बाजार येथे  निघाले. चोहोट्टा बाजार येथून काही अंतरावर दोघेही दुचाकीवरून खाली उतरले.  ते दोघेही एका कारमध्ये बसत असल्याचे शिवरकार यांना दिसले. त्यांना आपली  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कारचा पाठलाग केला व चोहोट्टा  बाजार येथे कारला अडवले. यातील एकाबरोबर त्यांची हाणामारी झाली. हा प्रकार  तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी पाहिल्याने त्यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनला  आणले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :akotअकोटCrimeगुन्हाArrestअटक