दोन लाखांचा गुटखा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:33 IST2017-10-10T02:33:05+5:302017-10-10T02:33:22+5:30

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  तीन ठिकाणी छापेमारी करीत दोन लाखांचा गुटखा साठा जप्त  केला आहे. विशेष पथकाने गत आठवड्यात मंगळवारी छा पेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पुन्हा  ही कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे.

Two lakhs of gutka seized | दोन लाखांचा गुटखा साठा जप्त

दोन लाखांचा गुटखा साठा जप्त

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाईघनश्याम अग्रवालचे प्रताप सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  तीन ठिकाणी छापेमारी करीत दोन लाखांचा गुटखा साठा जप्त  केला आहे. विशेष पथकाने गत आठवड्यात मंगळवारी छा पेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पुन्हा  ही कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे.
अळसपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी  सिंधी कॅम्पमधील सतनाम प्रोव्हिजन येथे छापा टाकून मोतीराम  गोविंदराव दुलानी याच्याकडून गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर  चंद्रनारायण लालचंद अग्रवाल याच्या मालकीच्या जुना भाजी  बाजारातील भगवती सुपारी या प्रतिष्ठानावर छापा टाकून गुट ख्याचा साठा जप्त केला. तसेच जुना भाजी बाजारातीलच चमन  सितारात अग्रवाल याच्या मालकीच्या अंबिका ट्रेडर्स येथेही  विशेष पथकाने छापा टाकून गुटखा साठा जप्त केला. या  साठय़ामध्ये एक लाख रुपयांची पानबहार, चारमिनार व राजरत्न  किवामचे बॉक्स, सुगंधित तंबाखू व आणखी गुटख्याचा साठा  जप्त केला. गत आठवड्यापासून विशेष पथक, सिटी कोतवाली  पोलिसांनी गुटखा माफियांवर केलेल्या छापेमारीत तब्बल ८५  लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. गुटखा माफियांवर  मोठय़ा प्रमाणात कारवाया करीत गुटखा साठा जप्त करण्यात  आल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Two lakhs of gutka seized