दोन लाख रुपयांची रक्कम पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:53 IST2019-04-05T15:53:03+5:302019-04-05T15:53:11+5:30
अकोट (जि. अकोला): लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नाकाबंदी दरम्यान अकोट तालुक्यातील रुईखेड फाटा जवळ दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे.

दोन लाख रुपयांची रक्कम पकडली
अकोट (जि. अकोला): लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नाकाबंदी दरम्यान अकोट तालुक्यातील रुईखेड फाटा जवळ दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे. ही कारवाई ५ एप्रिल रोजी एसएसटी पथक व अकोट ग्रामीण पोलिसांनी केली. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने महसूल व पोलिसांचे पथक निवडणुकीनंतर अवैध मागार्ने निधी देऊ नये, याकरता नाकाबंदी करून आहेत. दरम्यान अंजनगाव मार्ग मागार्ने दोन लाख रुपयांची रोख रक्कम येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून रुईखेड फाट्यावर नाकाबंदी करून एका इसमास तपासले असता त्याच्याकडे दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम ताब्यात घेतली आहे. रक्कम बाळगणारा व्यक्ती तेल्हारा येथील व्यापारी असल्याचे माहिती आहे. त्याने ही रक्कम दालमीलची असल्याचे सांगितले. मात्र तो ही रक्कम कुठे घेऊन चालला होता यांची कसून चौकशी करण्यात येत आहे ही कारवाई अकोट तहसीलदार अशोक गीते ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी रुपनर, तलाठी डोंगरे, चौरे, पो.काँ.श्रीकृष्ण गावंडे, रामेश्वर भगत, विशाल शिरसाट, महेश श्रीवास, विलास अस्वार, अविनाश राऊत यांनी केली.