विहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू ; एक गंभीर

By Admin | Updated: February 18, 2015 01:18 IST2015-02-18T01:18:45+5:302015-02-18T01:18:45+5:30

संग्रामपूर तालुक्यातील घटना; ट्रॅक्टरचालक व शेतमालकावर गुन्हा दाखल.

Two laborers died in a well in the well; A serious | विहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू ; एक गंभीर

विहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू ; एक गंभीर

खामगाव (जि. बुलडाणा) : विहिरीचे खोदकामासाठी जिलेटिनचा स्फोट केल्यानंतर निर्माण झालेल्या वायूमुळे विहिरीत गुदमरुन दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एका मजुराची प्रकृती गंभीर झाली. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी संग्रामपूर तालुक्यात निमखेड शिवारात घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निमखेड शिवारातील माणिकराव परकाळे यांचे शेतात विहिरीचे खोदकाम सुरु आहे. या खोदकामासाठी जिलेटिन या स्फोटकांचा वापर करण्यात येत होता. १६ फेब्रुवारी याप्रमाणे विहिरीत जिलेटिनचा स्फोट करण्यात आला. त्यानंतर या विहिरीवर खोदकाम करणारे मजूर अंबादास महादेव डाखोरे (वय ३२) रा.निमखेड, रतनसिंग रहेलसिंग जमरा (वय ३४) रा.सुनगाव, राम लक्ष्मण कासळेकर रा.वसाली हे विहिरीत उतरले होते. मात्र स्फोटामुळे विहिरीत निर्माण झालेल्या वायुमुळे तसेच पुरेश्या प्रमाणात प्राणवायू न मिळाल्याने यातील अंबादास महादेव डाखोरे (वय ३२) रा.निमखेड व रतनसिंग रहेलसिंग जमरा (वय ३४) रा.सुनगाव या दोघांचा मृत्यू झाला. तर राम लक्ष्मण कासळेकर रा.वसाली या मजुराची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी रमेश पांडूरंग परकाळे यांनी तामगाव पो.स्टे.ला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी ट्र ॅक्टरचालक क ैलास नानुराम जाट रा.जामोद तसेच शेतमालक माणिकराव पांडूरंग परकाळे रा.निमखेड अशा दोघांविरुध्द विनापरवाना हलगर्जीपणे स्फोटकांचा वापर करुन स्फोट घडवून आणत दोघांच्या मृत्यूस तसेच एकास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two laborers died in a well in the well; A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.