ट्रकच्या धडकेत दोन ठार; दोन जखमी

By Admin | Updated: May 29, 2015 02:37 IST2015-05-29T02:02:09+5:302015-05-29T02:37:20+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; मृतक पुणे जिल्ह्यातील.

Two killed in truck crash Two injured | ट्रकच्या धडकेत दोन ठार; दोन जखमी

ट्रकच्या धडकेत दोन ठार; दोन जखमी

कारंजा ( जि. वाशिम): नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर एका मालवाहू वाहनास भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले. ही घटना कोळी फाट्याजवळ २८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. कारंजाहून एमएच १0 के-६४४0 क्रमांकाच्या मिनी ट्रकला समोरुन येत असलेल्या एमएच ३१ डीएस - ७७८६ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत मिनी ट्रकचा अक्षरशा चुराडा झाला आणि त्यामधील एक जण जागीच ठार तर दुसरा कारंजा ग्रामीण रूग्णालयात दगावला. दोन्ही मृतक मयूर हांडे (२५) आणि सचिन खोरवे (३0) पुणे जिल्हा तालुका जुन्नर येथील रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामध्ये ट्रकमधील हाजी अन्सार कुरेशी (४५) रा. टेकानाका नवी बस्ती नागपूर व निशांत महेंद्र डोंगरे (२२) रा. मुंडे गोरेगाव जि.गोंदिया हे दोघे जखमी झाले.

Web Title: Two killed in truck crash Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.