ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:21 PM2020-08-12T20:21:55+5:302020-08-12T20:23:38+5:30

हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.

Two killed, three seriously injured in truck-car accident | ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Next

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाटा दरम्यान भरधाव ट्रक व कारची अमोरासमोध धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.
मूर्तिजापूरकडून अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या एम एच १९ एएफ ६८८९ क्रमांकांच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे १० झेड ५००१ ने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधुन प्रवास करीत असलेले गणेश जनार्दन जाधव (३५) व एक महिला जागीच ठार झाली. या कारमधून गणेश जनार्दन जाधव, उषा पांडूरंग सोनवणे, शिवकन्या जाधव व सार्थक गणेश जाधव (७), हे चार जण औरंगाबाद येथून नागपूर येथे जात होते. मृतांमध्ये नागपूर येथे आरपीटीएस ला कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिका?्याच्या पत्नी चा समावेश असल्याची माहिती आहे. कार मध्ये दोन महिला असल्याने वृत्त लिहिस्तोवर मृतक महिलेचे नेमके नाव काय हे स्पष्ट होऊ शकले नाही. या अपघातात दोघे जण घटनास्थळीच ठार झाले तर एक महिला व एक ७ वषार्चे बालक गंभीर जखमी झाले आहे. या गंभीर जखमींना अमरावती येथील इरवीन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कारच्या काचेवर लागलेल्या ई - पास मुळे कारमधील व्यक्तींचीे नावे कळू शकली. (शहर प्रतिनिधी )

Web Title: Two killed, three seriously injured in truck-car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.