अपघातात मलकापुरातील दोन ठार
By Admin | Updated: May 28, 2016 01:53 IST2016-05-28T01:53:04+5:302016-05-28T01:53:04+5:30
यवतमाळ येथे अपघात.

अपघातात मलकापुरातील दोन ठार
मलकापूर (जि. बुलडाणा): यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव साखर कारखान्याजवळ ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात मलकापूर तालुक्यातील दोघे ठार, तर एक जण जखमी झाला. बोदवड (जि. जळगाव) येथे नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहून परत येत असताना हा अपघात घडला.
मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील मंगेश नामदेव वर्हाडे व सुवर्णा मंगेश वर्हाडे (२८) हे पती-पत्नी आणि त्यांचे मामा श्रीकृष्ण प्रल्हाद नारखेडे (रा. रामवाडी ता. मलकापूर) हे बोदवड येथे सुवर्णा यांच्या भावाला लग्नाला उपस्थित राहिले होते. त्यांच्यासमवेत कोल्हाडी (ता. बोदवड जि. जळगाव) येथील नातेवाइकदेखील होते. यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव साखर कारखान्याजवळ त्यांच्या चारचाकी गाडीला ट्रकने धडक दिली. यामध्ये सुवर्णा वराडे व ङ्म्रीकृष्ण नारखेडे हे ठार झाले. मंगेश वराडे हे जखमी झाले आहेत.
अन् रुद्र पोरका झाला!
वर्हाडे दाम्पत्याने लग्नासाठी सहा वर्षाच्या रुद्र या मुलाला सोबत घेतले नव्हते. सुवर्णा वर्हाडे अपघातात ठार झाल्याने चिमुकला रुद्रा मातृप्रेमाला पोरका झाला आहे.