कार व मालवाहू वाहनाच्या अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 17:43 IST2021-09-04T17:41:21+5:302021-09-04T17:43:30+5:30
Accident News : मालवाहू पिकप गाडी व कारचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना शनीवारी दुपारी घडली.

कार व मालवाहू वाहनाच्या अपघातात दोन ठार
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसाग मार्गावर कट्यार बस थांब्यानजीक मालवाहू पिकप गाडी व कारचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना शनीवारी दुपारी घडली. मृतकांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोलाकडून म्हैसांगकडे सिलेंडर वाहून नेणारे मालवाहू पिक अप वाहन ( एम एच 30 बी डी 0345) व दर्यापूरकडून अकोला कडे जाणारी कार (एम एच 38 5727) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातात कारचा चालक ज्ञानेश्वर रवींद्र खेळकर (२९, खामगाव) जागीच मृत्यू झाला. तर प्रवासी जागृत मोमाया,स्नेहा हे दोघे गंभीर जखमी झाले, पिकअप गाडीचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (३२, रा. दहीहांडा) याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल अब्दुल फईम शेख,प्रकाश कोकरे ,संजय इंगळे, गिरीश विर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,जखमींवर उपचार सुरू आहेत.