अपघातात २ ठार, १0 जखमी

By Admin | Updated: October 5, 2014 01:04 IST2014-10-05T00:23:00+5:302014-10-05T01:04:17+5:30

ट्रकची एसटीला धडक : खामगाव जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील घटना.

Two killed and 10 injured in accident | अपघातात २ ठार, १0 जखमी

अपघातात २ ठार, १0 जखमी

खामगाव : खामगावहून अकोल्याकडे जाणार्‍या एस.टी.ला समोरुन येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर १0 जण जखमी झाले. ही घटना ३ ऑक्टोबरच्या दुपारी १ वाजेच्या सुमारास टेंभुर्णा फाट्यानजीक घडली.
जळगाव खान्देश आगाराची एम.एच.५३0७, जळगाव-राळेगाव ही एस.टी.बस खामगाव बसस्थानकावरील प्रवाशी घेवून दुपारी १२.४0 वाजता अकोल्याकडे निघाली. दरम्यान टेंभुर्णा फाट्यानजीक असलेल्या अग्रवाल पेट्रोलपंपासमोर समोरुन खामगावकडे येणार्‍या डब्ल्यू.बी.-२३- 0५३५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने एस.टी.ला धडक दिली. यामध्ये सौ.निर्मला ओंकार जावारकर (५३) रा.मोठी उमरी, अकोला व रामनारायण पिरदान बोहरा (५८) रा.खामगाव हे दोघे जण जागीच ठार झाले. तर कृष्णा लक्ष्मीनारायण बोहरा (५0), तेजकंवर पिरदान बोहरा (६५), सौ.चित्रलेखा रामनारायण बोहरा (५0), वत्सला दामोदर डिवरे (६८) रा.वडती वसाडी, लक्ष्मीनारायण पिरदान बोहरा (५६) रा.खामगाव, सोमेश्‍वर सहदेव वाघमारे (४५) रा.पिंपळगाव राजा, ओंकार उत्तम जावरकार (५४) रा. मोठी उमरी अकोला, तेजश्री सोमेश्‍वर वाघमारे (८) पिंपळगाव राजा, श्रावणी गणेश तायडे (३) रा.अकोला हे १0 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. बसचालक मोतीराम किसन पवनकार (३५) याने ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रक क्र.डब्ल्यू.बी.२३-0५३५ च्या चालकाविरुध्द कलम २७९,३३७,३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two killed and 10 injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.