राष्ट्रीय महामार्गावर ट्रक - दुचाकी अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 15:47 IST2021-06-22T15:46:33+5:302021-06-22T15:47:30+5:30
Accident Near Murtijapur : जमठी फाट्याजवळ सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक - दुचाकी अपघातात दोन जण ठार
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामठी फाट्या जवळ ट्रक - अपघात दोन जण ठार झाल्याची घटना २२ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली
अमरावती कडून अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक सी जी ०४ एन सी ५०९९ ने दुचाकी क्रमांक एमएच ३० बी एम ४०९७ ला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष रमेश शिंदे (३५), प्रकाश गंगाराम जाधव (३७) रा. मासा (सिसा) बोरगाव हे दोघे ठार झाले. धडक एवढी जबरदस्त होती की त्यातील एक जण घटनास्थळीच तर दुसरा उपचारादरम्यान गतप्राण झाला. घटनेची माहिती कळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतकाला व जखमीला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु दुर्दैवाने दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. अधिक तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस करीत आहे.