मोटारसायकलच्या धडकेत दोन जखमी

By Admin | Updated: September 15, 2016 03:07 IST2016-09-15T03:07:43+5:302016-09-15T03:07:43+5:30

चान्नी-मळसूर रस्त्यावर अपघात.

Two injured in motorcycle crash | मोटारसायकलच्या धडकेत दोन जखमी

मोटारसायकलच्या धडकेत दोन जखमी

खेट्री (जि. अकोला), दि. १४ : नजीकच्या चान्नी-मळसूर रस्त्यावर चान्नी गावाजवळ १४ सप्टेंबरच्या रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मोटारसायकल व सायकलची समोरसमोर धडक झाली. या अपघातात दोघेही जखमी झाले. चतारी येथील मंगेश फाळके हे बुधवारी रात्री एम.एच.३0 ए.जी.३७५५ क्रमांकाच्या मोटारसायकलने मळसूर येथून गावाकडे जात होते. याचवेळी सायवणी येथील पोस्टमन त्र्यंबक सखाराम रोठे (५८) हे चान्नीहून सायवनीकडे जात होते. चान्नी गावाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यात दोघेही जखमी झाले. परंतु, जखमी मोटारसायकलचालक घटनास्थळाहून निघून गेला. मात्र, पोस्टमन रोठे यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला असून, डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर, त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यास हलविण्यात आले. फाळके यांच्यावर चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनाही अकोल्यास हलविण्यात आले आहे.

Web Title: Two injured in motorcycle crash