गुलजारपुऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:19 IST2021-04-27T04:19:50+5:302021-04-27T04:19:50+5:30

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गुलजारपुरा येथे दोन गटात तुफान हाणामारी ...

Two groups clash in Gulzarpur | गुलजारपुऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी

गुलजारपुऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गुलजारपुरा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलजारपुरा येथे क्षुल्लक कारणावरून एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. शाब्दिक वाद व हाणामारीनंतर एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे वाद प्रचंड वाढत असताना या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यानी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली. दोन्ही गटातील सुमारे १५ जणांविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपी वाढणार असल्याची माहिती असून परिसरात अफवा पसरविण्यात येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र तरीही हा वाद पेटविण्याचा प्रयत्न कुणी करेल तर त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुलजारपुरा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: Two groups clash in Gulzarpur